त्याला काय घंटा येतं ?
चित्रपट सृष्टीत मोजमाप काढायला परिमाण नसल्याचे खूप फायदे आणि प्रचंड तोटे आहेत. म्हणजे आदिदास किंवा नाईके चे शूज इतक्या हजार रुपयात आणि रस्त्यावरचे काही शे रुपयात ही कशी ठाम समजूत आहे. तसं इथे वागताना प्रॉब्लेम होऊ शकतो. उदाहरण घ्यायचं झालं तर सर्वात सोपं म्हणजे अभिनेत्यापासून सुरु करू. कुणीतरी चिंतामणी वामनराव धनवडे राहणार रहिमतपूर जिल्हा सातारा इन मीन तीन मालिकामध्ये ४ सीन आणि फेष्टीवलच्या १६ short फ्लीम्स (हो ‘फ्लीम्स’च फिल्म्स न्हवे. ),गेला बाजार चिंचोली बंदर इंटरन्याशणल फिल्म फेस्टिवल मध्ये मध्ये सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा पुरस्कार आहेच bio data सोबत पुरस्कार स्वीकारतानाचा फोटो इत्यादी… अशी व्यक्ती अभिनेता होण्यासाठी भेटून जाते. त्याला अभिनेता व्ह्ययचच नसत त्याला थेट नायक बनायचंय. त्याच्या ह्या इच्छेला समोरचा माणूस त्याच्या परीने सौम्य विरोध करतो. स्थिरावलेल्या नटांच्या स्ट्रगल संदर्भातले ठेवणीतले किस्से सांगून अनुभवाच महत्व समजावून सांगायचा प्रयत्न वगैरे करतो.मात्र आकाश ठोसर आणि रिंकी राजगुरू ची मनात उदाहरण घेऊन सर पे कफन बांधलेली ही व्यक्ती बाहेर आल्यावर त्याच्या सोबतच्या व्यक्तीला पहिलं वाक्य जे बोलते ते म्हणजे “त्याला काय घंटा येत”
पावूल बाहेर पडताच त्या दिग्दर्शकाच्या आजवरच्या सिनेमांचे वाभाडे काढले जातात.
“हा काय सांगतो, ह्याचा मागचा सिनेमा बघितलाय. रविवारी थियेटरला गेलो १५ माणसं पण न्हवती. म्हणे स्ट्रगल चुकत नाही …काही काही लोकांना उगाचच डोक्यावर चढवून ठेवलय आपल्या (?) इंडस्ट्रीने.”
“ अरे पण त्याच्या आधीच्या सिनेमा…”
“मटका…किती बकवास होता. हा आता लोक चालला वैगेरे म्हणतात पण मला काही तो अज्जिबात आवडला वगेरे न्हवता.”
बर ही वृत्ती फक्त अननुभवी अभिनेत्यांमध्येच असते असं मानायलासुद्धा फारसा वाव नाही. कधीतरी अभिनयाचं दुकान बंद पडलं म्हणून लिखाणाकडे वळलेले आणि तरीही सिनेमा लेखकाचा टिळा न लागलेले काही स्वयंघोषित लेखकसुद्धा थोड्या फार फरकाने असे वागतात.”
“कुठून आणला होता तो कॅमेरामेन त्यापेक्षा माझ्या लग्नातला विडीओ केलेला पोरगा बरा. साध्या हिरोईनच्या चेहऱ्यावरची मुरूमं लपवता आली नाहीत ह्याला. वाक्यच्या वाक्य अंधुक प्रकाशात शूट केली म्हणे hollywood फील. ह्यांनी तिकडेच जाऊन आपली आई xxxxx… काय घंटा येतं रे त्याला.”
एखाद्या सिनेमातील एखादी भूमिका एखाद्या नटाच्या वाट्याला आली कि दुसरा नट आपणच कसे त्या रोल साठी करेक्ट होतो..”एवढ जबरदस्त character आहे ह्याला कस झेपणार ? ह्याचा तेवढा आवाका आहे का? अभ्यास आहे का? पर्सोना आहे का ? केवळ नशीब बलवत्तर म्हणून त्याला रोल मिळतात नाहीतर काय घंटा येतं त्याला….”
बर दिग्दर्शकांचं म्हणाल तर आपण दिग्दर्शक म्हणून आत्यंतिक सुमार आहोत हे न कळलेले तर संख्येने बेसुमार. उगाचच मजीद माजिदी, त्रूफा, कुरोसावा इत्यादी नावं घ्यायची आणि “कुठे ते जागतिक सिनेमे आणि हे लोक काय बनवतायत.” ज्यांनी मराठी चित्रपट सृष्टीला आज असलेले बरे दिवस दाखवलेत त्या सगळ्यांच्या नावाने शिमगा करायचा. आपण ज्या सिनेमांबद्दल वाईट साईट बोलतोय त्यांनी माफक का होईना पण यश मिळवलंय, निदान त्यांच्यामागे त्या नावांची चर्चा करण्याइतपत तरी ते लोकांपर्यंत पोहोचलेत असं काही कळण्या – दिसण्या एवढी दृष्टीच प्रगल्भ नाही. तुम्ही कुठल्याही नावाजलेल्या दिग्दर्शकाच नाव घ्या ह्याचं पालुपद तेच “त्याला काय घंटा येतं ?”
क्काय प्रॉब्लेम आहे राव तुम्हा लोकांचा? आत्मपरीक्षण नावाच्या आरशात एकदा स्वतःचं तोंड पहावं जरा. करा की जरा खुल्या दिलान कौतुक चांगल्या घडामोडींचं. दोन पेग पोटात गेल्यावर अमुक एक सिनेमा केवळ गाण्यांवर चालला बर का ? त्यांच्या मागे झी चा suport आहे रे ते काढून करा म्हणावं, त्याचे सिनेमे फक्त फेस्टिवललाच चालतात रे , तो business चे खोटे आकडे सांगतो रे….यशस्वी लोकांची अशी पाठीवर उणी दुणी काढण्यापेक्षा चांगलं काय पाहिलं, चांगलं काय वाचलं, चांगलं काय घडलं ह्याबद्दल बोलूयात ना. रोज वेगवेगळे प्रयोग होतायत, box office वर विक्रम रचले जातायत, प्रेक्षक आशेने पाहतायत. आपणही आजूबाजूच्या गोष्टींकडे जरा positively बघुयात ना खरच जाम मज्जा येईल. आणि हो सगळ्यात महत्वाच म्हणजे घंटानाद बंद होईल. _जय हिंद…जय मराठी चित्रपटसृष्टी.
विजु माने
विजु सर , उत्तम ब्लॉग ....लोक दुसर्याच्या चुका असे काढतात की जसे हेच मोठे शहाने ..., हा ब्लॉग त्या प्रत्येक शहान्याने वाचला पाहिजे ...
Hello sir meko serial me aana he